ही क्लिप आली कुठून, मनोज जरांगे पाटलांविरोधात चाललेय कायफ राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप

Foto
 मुंबई : प्रश्न ५०० कोटींचा नाही, कशा प्रकारचे प्लानिंग चालते, याचा आहे. या प्लानिंगमध्ये मीडियालाही धरले आहे. कोण रिपोर्ट छापू शकते आणि कोण रिपोर्ट छापू शकत नाही आणि छापला नाही तर आम्ही काय करू ही दिलेली एक धमकी आहे. याचे भान ठेवणे गरजेचे आहे. कशा प्रकारे नरेटिव्ह पसरवले जाते, कशा प्रकारे हे प्लानिंग करत आहे, कशा प्रकारे एखाद्या माणसाला बदनाम केले जात असेल, हे प्रश्न गंभीर आहेत, असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कथित ऑडिओ क्लिपबाबत प्रतिक्रिया दिली.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ५०० कोटी रुपयांसंदर्भातील अर्ध्या तासाची ऑडिओ क्लिप सादर करत खळबळ उडवून दिली. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी या प्रकरणात स्पष्ट शब्दांत भाष्य केले. मनोज जरांगे यांच्यासारखा माणूस, आरक्षण मिळेल, मिळणार नाही, यानंतरचा भाग झाला. पण, मनोज जरांगे पाटील यांना बरोबर घ्यायचे, नंतर बदनाम करायचे, त्यांचीच माणसे कशी फोडायची, जरांगे पाटील यांच्या विरोधात चाललेय काय, इथे बसून सगळ्या गोष्टींचे प्लानिंग, हे कोण बोलत होते, ते आम्हालाही माहिती आहेत. या लोकांनी या गोष्टीचा नीट विचार करावा. उद्या ज्यावेळेस सत्ता जाईल ना, त्यावेळेस कोणकोणत्या गोष्टी अंगाशी येणार आहेत, याचा यांना अंदाज नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिला.